न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या एस झीप (एमएच १४ ईएम २१७७) या टेम्पोमध्ये आरोपींनी वेगवेगळया कंपनीचा २,४६,६४० रु. किं. चा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला, एक मोबाईल असा एकुण ५,०६,६४० रुपये किंमतीचा माल स्वतःच्या फायद्याकरीता अवैधरित्या खरेदी करुन विक्रीकरीता जवळ बाळगला.
चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण पोलिसांनी (दि. १५) रोजी ९.४० वा. चे सुमारास चक्रेश्वर रोड, बडवे कॉम्प्लेक्स समोर, चाकण येथील कल्पतरू सोसायटीच्या पार्कींगमध्ये पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी कारवाई केली.
विवेक हरीप्रकाश गुप्ता (वय २४ वर्ष, रा. फ्लॅट नं. ३, सी विंग, कल्पतरू सोसायटी, चक्रेश्वर रोड, बडवे कॉम्प्लेक्स समोर, चाकण, मुळगाव इरच तहसिल, गरौवठा जि. प्राशी, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















