न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- कंपनीच्या गेटसमोर थांबून फिर्यादी पार्किंगमध्ये गाडया लावून घेत असताना ट्रक (जीजे ३६ व्ही २०७६) तिथे आला. त्यावरील आरोपीने गाडी रस्त्यावर उभी केली. फिर्यादीने आरोपीस गाडी बाजूला घेण्यास सांगितले. ‘ रोड तुम्हारे बाप का है क्या?’ असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली.
त्यावेळी आरोपीसोबतच्या क्लीनरने गाडीतील लोखंडी टॉमी काढून ड्रायव्हरकडे दिली. आरोपी ट्रक चालकाने फिर्यादीच्या डोक्यात मारली. सोडविण्यास आलेल्या आणखी एकाला देखील टॉमीने कपाळावर मारले. दोघांना किरकोळ व गंभीर दुखापत केली.
हा प्रकार (दि. १४) रोजी रात्री आठ वा.च्या सुमारास मदरसन कंपनीसमोर, आंबेठाण येथे घडली. फिर्यादी किरण भास्कर मालूंजकर (वय ३४ वर्षे, आंबेठाण ता. खेड) यांनी आरोपी विक्रमभाई खोडाभाई सुरेला (वय २८ वर्षे, रा. खंडीयाल, ता. मालीया, जि. मोरवी, गुजरात) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (म्हांळुगे) पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















