न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- तक्रार देऊन फिर्यादी प्रनव हनुमंत खंडागळे व एन सी (३२२२/२०२२) यातील तक्रारदार आकाश पन्नालाल चोरडीया हे चाकण पोलीस स्टेशनच्या गेट समोर थांबले. त्यावेळी त्यांचे इतर व्यक्ती तिथे आले. (दि. १५) रोजी दुपारी १.०० च्या सुमारस चाकण पोलीस ठाणे गेटसमोर काहीजण जमा झाले.
आपआपसात झोंबझोबी करून मोठ्याने आरडा ओरडा, भांडण करीत असताना दिसले. तेव्हा फिर्यादी व डे ऑफिसर पोसई / मडके यांनी इसमास ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारला. आरोपींनी पुन्हा चाकण पोलीस समोरील गेटवर मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत भांडण व दंगा केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
चाकण पोलिसांनी साहिल महेश नाईरे (वय २३ वर्षे रा. वराळे), अक्षय पन्नालाल चोरडिया (वय २८ वर्षे रा. चाकण), आकाश आशोक इंगळे (वय २५ वर्षे रा. शिरोली), आकाश पन्नालाल चोरडिया (वय २२ वर्षे चाकण), प्रणव हनुमंत खंडागले (वय २० वर्षे रा. मुटकेवाडी चाकण), आशिष आशोकराव इंगळे (वय २८ वर्षे रा. शिरोली), प्रतीक हनमंत खंडागळे (वय २२ वर्षे), शकर महेश नाईकनवरे (वय २६ वर्षे रा. वराळे), पवन महिंद्र हलगे (वय २१ वर्षे, नगरपालीका चौक, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















