न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुष मंत्रालय घोषित हर दिन हर घर आयुर्वेद या संकल्पनेतून प्रेरित होऊन निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने प्रत्येक घरोघरी आयुर्वेद पोहोचावा, यासाठी निर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली असणार आहे.
या दिनदर्शिकेचा उद्देश एकच आहे. घरातील प्रत्येक माणूस आरोग्याच्या दृष्टीने जागरूक व्हावा. त्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आरोग्यदायी महत्त्व, पौष्टिक पाककृती, आहारीय वर्ग त्याचे उपयोग, उपवासाला काय खावे, घरगुती कोणते उपाय करावे, आपली प्रकृती कशी वाढावी त्याची आपल्या आजारांशी काही संबंध असतो का?, नक्षत्र वनामधील वनस्पतींचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे, शरीरात कोणते दोष असतात ते बिघडल्यावर कोणते आजार होतात व ते साम्यावस्थेत आणण्यासाठी काय उपाय करावेत. पंचकर्म म्हणजे काय त्याने शरीर शुद्धी कशी होते, किती दिवस लागतात अशी सर्व माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे, अशी माहिती निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक वैद्य निलेश लोंढे व संचालिका वैद्या सारिका लोंढे यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत दिली.
१८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी आमदार महेश लांडगे, तसेच महाराष्ट्रातील नामवंत वैद्या ज्योती मुंदर्गी, वैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य अतुल देशमुख ,वैद्य संतोष सूर्यवंशी, वैद्य जयकुमार ताम्हाणे, डॉ सुहास जाधव, डॉ प्रताप सोमवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.
















