न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- फिर्यादी यांच्या आत्याने केलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी अर्जदार व गैरअर्जदार यांना पिंपरी पोलीस चौकी येथे बोलावले होते.
चौकशी चालु असताना अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात वाद निर्माण झाला. पोलीसांनी अर्जदार व गैरअर्जदार यांना चौकीच्या बाहेर जाण्यास सांगितले. चौकीच्यासमोर फिर्यादी यांची चुलती माया पारखे व फिर्यादी, त्यांचे भाऊ यांना आरोपी यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी प्रशांत प्रकाश पारखे (वय ३६ वर्ष, रा. सर्वे नं ९३/३/७, शांताई क्लासीक बिल्डीग, चौथा मजला, फ्लॅट नं ४०४, रावेत) यांनी आरोपी महिला आरोपी (वय ४८ वर्षे, रा. रावेत), संजय शांताराम माळी (वय ४६ वर्षे, रा. शेलारवाडी), महिला आरोपी (वय ४० वर्षे), महिला आरोपी (वय २० वर्षे, रा. शेलारवाडी), महिला आरोपी (वय २६ वर्षे, रा. पुनावळे), संकेत बोरावके (वय ३० वर्षे, रा. पुनावळे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















