न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- घरी असताना फिर्यादी महिलेच्या व्हाटसअॅपवर अज्ञात अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाने ” Runuka sangtani mujhe tumhari Puri family ko marne ka contract Mila hai jisme tumhare dono bachhe aur tum aur tumhara husband bhi hai agar apani family ki life important hai to kal raat tak 20lakhs arrenge kana warna Mai apana kam kar dunga aur paisa ya phir jan iska Jawab Aaj raat tak aa jana chahiye असा संदेश पाठवला.
त्यात २० लाख रुपये दे नाहीतर तुझ्या मुलांना आणि नव-याला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १७) रोजी सकाळी ९.१० वाजता, मोरवाडी चौक, पिंपरी येथे घडला.
५१ वर्षीय महिला फिर्यादी हिने आरोपी ९१६३०२६८४३३८ या अज्ञात अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.















