न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- चिखली, मोरेवस्तीतील सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शाळेच्या प्रांगणात “वार्षिक क्रीडा महोत्सव” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी झेंडा उंचावत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुख तथा सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष/सचिव संभाजीराव सुभाषराव शिरसाट होते. कार्यक्रमाचे उद्घाटन (बाळासाहेबांची शिवसेना) जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व मशालीचे पूजन करण्यात आले.
यावेळी (बाळासाहेबांची शिवसेना) पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, पांडुरंग साने, सुरेश तात्या म्हेत्रे, राजाराम मोरे, संगीता ताम्हाणे, साधना मळेकर, कुंदन गायकवाड, स्विनल म्हेत्रे, दत्तात्रय भालेराव, यश साने, रूपाली साने, मनोज जरे, गणेश मळेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी क्रीडा मशालीची फेरी काढून क्रीडा मैदानाचे पूजन केले. इ. २ री व ३ रीतील विद्यार्थ्यांच्या संघाचा खेळ सुरू करण्यात आला. दरम्यान विद्यार्थ्यांना “वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी” पाहुण्यांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराव सुभाषराव शिरसाट, सूत्रसंचालन श्रीकांत किर्तीकर व आभार ठाकरे यांनी मानले. विद्यार्थ्यांचा शो मॅच पाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.