न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- राहते घर लॉक लावुन बंद करीत फिर्यादी हे आईला भेटण्यासाठी सांगली येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरटयाने घराचा लाकडी दरवाजा खालच्या बाजुने कापुन त्यावाटे घरात प्रवेश केला.
घरातील २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ४ मणी व दोन वाटया, व्यावसायीक सिलेंडर, पाण्याची मोटार असे एकुण १०,००० रुपये किंमतीचा माल चोरी करुन नेला आहे. हा प्रकार (दि. १५) रोजी सायंकाळी ६:०० ते (दि. १७) रोजी सायंकाळी ७:०० वा. चे दरम्यान पंडीत चाळ, शिवाजी विदयालयाच्या पाठीमागे, देहुरोड येथे घडला.
५० वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















