न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन आरोपीने त्याची दुचाकी बीआरटीमध्ये उलट दिशेने घुसवली. फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत यास धडक दिली. अपघातात त्याला गंभीर दुखापती होवुन त्याचा मृत्यु झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी दुपारी १.३० वाजताचे दरम्यान हॉटेल गोविंद गार्डन, शेजारील पुलावर, बीआरटीमध्ये, पिंपळे सौदागर येथील सार्वजनीक रस्त्यावर घडला.
फिर्यादी तुकाराम संपत भोंडवे (वय ६४ वर्षे, फ्लॅट नंबर २०१, बी बिल्डींग, सह्याद्री शृबेरी हौसींग सोसायटी, जी. के. पॅलेस सोसायटीच्या शेजारी, बो-हाडेवाडी, मोशी) यांनी आरोपी हिरो कंपनीची स्पेंडर प्लस मोटार सायकल (एम.एच.१४ जी.एफ. ०९५२) वरील चालक (नाव पत्ता माहीती नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















