न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च) :- महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणि रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि. ७ ) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि. ८ ) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. महापालिकेने १ मार्चपासून आठवड्यातून विभागनिहाय एकदा पाणीकपात सुरू केली आहे. ज्या भागांत बुुधवारी (दि. ६) व शुक्रवारी (दि. ८) पाणी बंद असते.
त्यादिवशी त्या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.