न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे कामगार नेते व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन हनुमंत नामदेव लांडगे यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या “प्रदेश सचिव” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
हनुमंत लांडगे हे महानगरपालिकेच्या कामगार चळवळीमध्ये गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत असून, सध्या ते कर्मचारी महासंघाच्या सेवानिवृत्त सेलचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय केनेकर यांनी हनुमंत लांडगे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.