न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ६ मार्च) :- महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहर किती चांगल्या प्रकारे घडविले आहे. याची शहरवासियांना कल्पना आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने या परिसरामध्ये एमआयडीसी कशी उभी राहिली? हे सर्वांना ज्ञात आहे. त्यानंर अजितदादांच्या नेत्रुत्वाखाली आम्ही गेली २० वर्ष या आधुनिक शहराची निर्मिती केली आहे. अजित पवारांनी विकासाचा झंजावात या शहरात उभा केला.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे यांनी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, जुन्नर तालुका युवकांचे नेते अतुल बेनके, देवदास निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, दत्ता साने, जालिंदर शिंदे, वसंत लोंढे, मा. आमदार जगन्नाथ शेवाळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी पदाधिकारी सर्व समाजाचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार लांडे पुढे बोलताना म्हणाले की, जनतेच्या आशिर्वादाने अजितदादांच्या नेत्रुत्वाखाली मी या शहराचा महापौर असताना त्या काळामध्ये भोसरी शहरात नाट्यगृह, हाॅस्पिटल, उड्डानपुल आदी विकासकामे मार्गी लावली आहेत. विद्यमान खासदार आढळराव गेली १५ वर्षे खासदार म्हणून काम करत आहेत. त्या खासदारांनी कोणता महत्वकांक्षी प्रकल्प या शहरात राबविला. त्यांनी १५ वर्षात कोणते दिवे लावले? नुसत्या बाता मारायच काम केल. परंतु, जनतेने पाहिले आहे की, गेल्या १५ वर्षात आढळरावांनी आहे त्या ठिकाणी काय असेल नसेल ते रेटुन खोटे बोलायचे आणि श्रेय लाटण्याचा उद्योग करायचे. खासदारांनी काम किती केल? काय केल? हे कोणालाच सांगता येन कठीण आहे.
भोसरीला एक गाव भोसरी आणि दहा गाव दुसरी अस म्हंटल जात. या परिसरामध्ये जून्नर, आंबेगाव, खेड या गावातून आलेल्या नागरिका वास्तव्यास आहेत. त्यांनी व भोसरीवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ठामपणे उभे रहावे, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित जनसमुदायांसमोर केले आहे.















