आयुक्तालयातील आठ गुन्हे उघडकीस; १३ दुचाकी जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दबंग कामगिरी करीत भोसरी, महाळुंगे, चिखली, एम. आय. डी. सी. भोसरी, दिघी परिसरात दुचाकीची चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाख रूपये किमतीच्या तब्बल १३ मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.
भोसरी पोलीस स्टेशन हददीत वारंवार होत असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस सपोनि कल्याण घाडगे व पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाच्या दोन टीम तयार केल्या. मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध सुरु केला. पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे यांच्या नेतृत्वाखालील टीम तपास करीत असताना टीममधील पोलीस अंमलदार सागर जाधव व आशिष गोपी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून भोसरी पोलीस ठाणे परिसरात मोटर सायकली चोरणारा आरोपी वाहन विक्री करण्याकरीता भोसरी स्मशानभुमीजवळ येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या दिमतीस तपास पथक अधिकारी कल्याण घाडगे, मुकेश मोहारे यांनी लागलीच तपास पथकातील दोन्ही टिम घटनास्थळी पाठवून सापळा रचित आरोपी रामेश्वर नवनाथ अडकिने यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसोशीने चौकशी करुन तपास केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हददीत भोसरी, भोसरी एम. आय. डी. सी. दिघी, चिखली, महाळुगे, चाकण पोलीस स्टेशन हददीत व पिंपरी चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ९३७/२०२२ भादवी कलम ३७९ या गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता आरोपीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हददीत व भोसरी परिसरात वेगवेगळया ठिकाणी मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. आरोपी रामेश्वर नवनाथ अडकिने हा भोसरी, दिघी, एम.आय.डी.सी. भोसरी, चिखली, महाळुंगे, चाकण या परिसरात त्याचा साथीदार परशुराम कांबळे (रा. भोसरी), याच्यासोबत मिळून चोरी करणारा अट्टल मोटर सायकल चोरटा आहे. त्याने आत्तापर्यंत मोटार सायकली चोरीचे एकुण ८ गुन्हे केले आहेत. आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकूण १३ मोटार सायकली असा एकुण ६,००,००० रुपये किं.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीवर भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३७/२०२२ भादवि कलम ३७९, भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८/२०२२ भादवि कलम ३७९, भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९७२/२०२२ भादवि कलम ३७९, भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३१/२०२२ भादवि कलम ३७९, चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४९/२०२२ भादवि कलम ३७९, दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६१ / २०२२ भादवि कलम ३७९, चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. १५४४ / २०२२ भादवि कलम ३७९, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०९/२०२२ भादवि कलम ३७९ असे आठ गुन्हे दाखल आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील, पोलीस उपायुक्त परि. १, प्रेरणा कट्टे सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि मुकेश मोहारे, सहा. फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, अजय डगळे, रविंद्र जाधव, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, प्रभाकर खाडे, सागर जाधव, आशिष गोपी, संतोष महाडीक, सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे यांनी केली.


















