न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्ष, नवीन वर्ष नवीन संकल्प २०२३ निमित्त मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा ‘ जन्मभुमि कर्मभुमितील भेटीगाठी आपली माती आपली माणसं भव्य दिव्य मराठवाडा संमेलनाचे आयोजन रविवार (दि. १) रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, पुर्णानगर येथे मराठवाडा जनविकास संघ व मरावाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
मराठवाडा संमेलनामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मराठवाडयातील ८ जिल्हे, मराठवाडा नावाशी संबधीत ५० विविध संघटनाच्या सामाजीक बांधीलकीन मराठवाड्याच्या मातीसाठी एकत्र आले होते. मराठवाडा संमेलनाचे उद्घाटन मराठावाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज अॅड. जी. आर. देशमुख, सुधीर बिंदु, डॉ. विवेक मुगळीकर, उदय वाईकर, सुभाष जावळे, दिलीपराव बारडकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजनांने करण्यात आले. देशभक्तीच्या जय घोषात मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देऊन शुभारंभ करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा सिंदगी विजापुर ते मराठवाडा ८ जिल्हे ते हैदराबाद ते पिंपरी चिंचवड ,पुणे गुरुवार दि. १२ जानेवारी ते सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ जाणार आहे त्या अनुषंगान सर्वांनी चर्चा आणि यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान देण्याचे ठरविण्यात आले.
मराठवाड्याचे भुमिपुत्र नितीन चिलवंत यांच्या मराठवाड्याच्या संबधीत चार संकल्प पुस्तिकांचे प्रकाशन स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजाच्या शुभहस्ते करण्यात आले त्याचबरोबर मराठवाडा भुमिपुत्र व अभिनव फांऊडेशने अध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण घटे यांच्या संकल्पनातुन निर्माण करण्यात आलेल्या www. globalmarathawada.org या वेबसाइटचे उद्घाटन एकनाथ पवार, अरुण पवार, डॉ. प्रिती काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज अॅड. जी. आर. देशमुख यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले कि, पिंपरी चिंचवड पुणे कर्मभुमितील मराठवाडा भुमिपुत्रांनी पवित्र माती मंगल कलश संवाद यात्राचा संकल्प केला आहे, तो मराठवाड्यात यशस्वी करण्याची जबाबदारी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती घेईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संवाद यात्रेच आनंदाने आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
प्रसिध्द वक्ता शिवभक्त सुभाष जावळे यांनी मराठवाडा मागास राहण्यामागची कारणे, शासन स्तरावरील अंमलबजावणीत दिरंगाई करणारे धोरण कशी जबाबदार आहेत तसेच ३७१ कलम लागु करुन मराठवाड्याचा आर्थिक तरतुदीतुन विकास करावा, याविषयीचे विचार पोटतिडकीनं मांडले.
सुधीर बिंदु यांनी, आपल्या जन्मभुमिची मराठवाड्याची आठवण कर्मभुमि पुणे मुंबईत वास्तवे करुन ठेवता अन् मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करतात हे वाखाण्याजोगे आणि अभिमानस्पद गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
प्रसिध्द सिनेगायक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी गायन करणारे उत्कृष्ठ सुत्रसंचालक उदय वाईकर यांनी देशभक्तीवर आधारीत सुंदर स्वागतगीत म्हणुन मराठवाडा संमेलनातील वातावरण आनंदी केले. मराठवाडा संमेलन कार्यक्रमाची प्रस्तावना व संकल्पना मराठवाडा भुमिपुत्र नितीन चिलवंत यांनी मांडली.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मराठवाडा संमेलनातुन आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जन्मभुमिसाठी वेळात वेळ काढुन थोड थोड काम केले तर आपला मराठवाडा मागास राहणार नाही. तसेच ७५ वर्षाच्या इतिहासात आपल्या मराठवाडयातुन पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा देशभक्तीच स्फुल्लींग मनामनात पेटवत निघणार आहे. त्यामध्ये सर्व मराठवाडा बंधु भगिनीनी तन मन धन लावुन सहभागी व्हावं. कर्मभुमितील मराठवाडा बांधवानी आपल्या जिल्ह्यातील पवित्र माती मंगल कलश संवाद यात्राच्या स्वागतासाठी उपस्थित राहवं, असे आवाहन केल.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ पवार म्हणाले, मराठवाड्यासाठी जे जे युवक नितीन चिलवंत यांच्यासारखे चांगले काम करत असतील त्यांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभा राहव, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई येथे जवळपास ५ हजार मराठवाड्यातील भुमिपुत्र यशस्वीपणे उद्योग व्यवसाय करत आहेत त्यांना ही एकाच मराठवाडा उद्योग विचारपीठावरुन एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करु, असं सांगितल.
मराठवाडा संमेलनासाठी मराठवाडा नावावर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी दिलीपराव बारडकर, प्रकाश इंगोले, मल्लीकार्जन सर्ज, भारत गोरे, गोरख भोरे, दत्तात्रय जगताप, सुनिल काकडे, शिवकुमारसिंह बायस, निळकंठ शेळके, डि. एस. राठोड, शंकर तांबे, श्रमिक गोजमगुंडे, प्रा. डॉ. प्रविण घटे, संतोष काळे, धनाजी येळेकर, मारुती बानेवार, आदिनाथ माळवे, शिवानंद चौगुले, विठ्ठल दळवे, संदीप चव्हाण, उमाकांतआप्पा शेटे, प्रभाकर चेडे, नामदेव पवार, वामन भरगंडे, शाम भोसले, सुनिल नाईकनवरे, राहुल चंदेल, दत्ता थोरात, लश्मण मुळुक, डॉ. विवेक मुगळीकर, सतिश काळे, समाधान गपाट, प्रल्हाद लिपणे, डॉ. यादवराव पाटील, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. नविन वर्षाचे नवीन संकल्प मराठवाड्याच्या मातीसाठी करुन मराठवाडा संमेलन उत्साहात पार पडले.
मराठवाडा संमेलनाचे सुत्रसंचालन शिवकुमारसिंह बायस यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्योजक शंकर तांबे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संकल्प प्रार्थना व राष्ट्रगीतानं करण्यात आली.


















