- अनधिकृतपणे वसविलेल्या लेबर कॅम्पच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- लेबर कॅम्प अनधिकृतपणे उभारत त्यातील संडासची लाईन पालिकेच्या मल:निस्सारण वाहिनीला जोडली आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनेक ठिकाणी खोदून चेंबरच्या खड्यात दगड, विटा, टाकून वाहिन्या बंद केल्या आहेत. तसेच लाईनही उघड्यावर सोडली आहे.
या दोन्ही वाहिन्या बंद झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याचे पाणीसुद्धा गढूळ, पिवळसर व दुर्गंधीयुक्त येत आहे.
सर्वे.न. २७, २८ तनिष्क कॉलनी, जगताप डेअरी, विशाल नगर परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. तातडीची उपाययोजना करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
















