न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- आत्याच्या घरातून उसने पैसे घेऊन फिर्यादी व त्यांचा कामगार गौरव पंडीत हे त्यांच्या कॅरी टेंपो (एमएच १४ एच यु ३२१२) या मधून जात होते. वाटेत चार अनोळखी इसम दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीच्या डोळयात मिरची पावडर टाकली. हातातील कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादीला हाताने मारहाण करीत शिविगाळ केली. जिवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादीकडील ९०,००० रोख व ८,००० रुपयांचा मोबाईल असा एकुण ९८,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन आरोपी पळुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री १०.२० वा सुमारास वाटेकरवाडी येथे, कानीफनाथ मंदिराजवळ ता. खेड येथे घडली.
फिर्यादी रोहीदास साहेबराव अरगडे (वय ३५ वर्ष, रा. काळुस, ता. खेड, जि. पुणे) यांनी दोन मोटार सायकलवरील आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















