- पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- सिंहगड एक्सप्रेस रेल्वेतुन फिर्यादी या तिची बहीण व बहिणीची मुलगी अशा तिघी ठाणे रेल्वे स्टेशन येथुन पिंपरी रेल्वे स्टेशन येथे उतरल्या. रिक्षा स्टॅन्डवर आल्यावर अज्ञात रिक्षाचा फिर्यादीच्या बॅगला धक्का बसला. त्यामुळे फिर्यादी या रिक्षा चालकास ‘रिक्षा निट चालवता येत नाही का?’ असे म्हणाल्या.
रिक्षा चालक फिर्यादीला काही न बोलता निघुन गेला. पंरतु, त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा (एम एच १४ जेपी ७१२७) चा आरोपी चालक फिर्यादीकडे बघुन हसला व ‘ जा जा निघ तुझी काय अवकात आहे ‘ असे म्हणुन फिर्यादीच्या अंगावर धावून आला. त्याने लोकांसमोर फिर्यादीचा हात पकडला. फिर्यादीने त्यास ढकलून दिले. त्याचा राग मनात धरुन आरोपी हातात दगड घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावुन आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.४) रोजी रात्री २१.३० वा पिंपरी रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॅन्डच्याजवळ घडला. ३५ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी रिक्षा (एमएच १४ जेपी ७१२७) वरील चालक (वय २८ वर्षे, नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















