- दोन्ही बाजूने निगडी पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- साईडवर काम करत असताना आरोपी यांनी संगणमत करुन “ तु या साईडवर कसे काय काम करतो ” असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ केली. हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपीने त्याच्या जवळील लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला. फिर्यादीचा मुलगा लखन धांडे (वय २७ वर्षे) हा सोडवण्यास आला असता, सह आरोपी २ ते ४ यांनी फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात, हातावर मारुन जखमी केले.
हा प्रकार (दि. ३) राजी सकाळी ११.३० वाजता अमृता हायस्कुलसमोर, रेम्बो हाउस कंस्ट्रक्शन साईड, यमुनानगर, निगडी येथे घडला. फिर्यादी मच्छिंद्र सोपान धांडे (वय ४२ वर्षे रा. नागसेनगर झोपडपटटी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी आरोपी काळु भानुदास धांडे (वय ५० वर्ष), दिगंबर काळु धांडे (वय २६ वर्ष), राहुल काळु धांडे (वय २२ वर्ष), दत्त राजु पिटेकर ( वय १९ वर्ष), सुनिल काळू धांडे (वय २४ वर्ष, सर्व रा. नागसेननगर झोपडपटटी, बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
याउलट परस्पर फिर्याद दिली आहे. यमुनानगर, निगडीत रेनबो हाउस कंस्ट्रक्शन या बांधकाम साईटवर (दि. ४) रोजी बॉबकॅट मशिन चालवत असताना आरोपी मश्चिंद्र धांडे, लखन धांडे आणि सोपान धांडे व इतर दोन आरोपी यांनी साईटवर येवून ‘ तुझी मशिन काढुन घे, ही साईट आम्ही घेतली आहे ‘ असे म्हणुन आपआपसात संगणमत करीत फिर्यादीस शिवीगाळ करुन दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीस तसेच त्यांच्या भावास जखमी केले, अशी फिर्याद सुनिल काळू धांडे (वय २४ वर्षे, रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
















