न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- कोल्हापूर येथील साउंड कास्टींग प्रा. लि. या कंपनीमध्ये पर्चेस डिपार्टमेंटमध्ये काम करतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. आरोपीने कंपनीच्या नावाने फिर्यादीच्या इंडियन स्टील कॉर्पोरेशन, चाकण व इंडियन स्टील मर्चंट, कुदळवाडी, चिखली या कंपनीकडे स्क्रॅप मालाची पर्चेस ऑर्डर दिली.
फिर्यादीकडून एकूण १७,२४,०४५ किलो स्क्रॅप खरेदी केले. एकूण ११,९४,२५,१०७ रुपयांपैकी आरोपीने ७,२९,९०,०४० रुपये दिले. परंतु, उर्वरित ४,६४,३५,०६७ इतक्या रक्कमेचा अपहार करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १८/०८/२०२२ पासुन ते १८/११/२०२२ पर्यंत इंडियन स्टील मर्चंट, कुदळवाडी, चिखली येथे घडली. फिर्यादी लुकमान जावेद खान (वय २९ वर्षे, व्यवसाय स्क्रॅप खरेदी-विक्री, रा. सेक्टर नं.२४, प्लॉट नं. ३९१, निगडी-प्राधिकरण) यांनी आरोपी स्वप्नील बाळकृष्ण पाटिल (पुर्ण पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















