- कुठे वाच्छता केल्यास परिवारास जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून आरोपी अटकेत….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- किराणा मालाच्या दुकानात फिर्यादी या एकटीच असल्याचे पाहुन आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला स्वतःच्या अंगावर ओढले “ मला तु कॉलेजमध्ये होती तेव्हापासुन आवडत आहे. चल आपण लॉजवर जावू ” असे बोलून फिर्यादीसोबत अशील कृत्य केले. त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
फिर्यादी या दुकानातुन बाहेर निघुन त्या राहत असलेल्या ठिकाणी पळत जावु लागल्या. तेव्हा आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करुन त्यांना अडवले. ” तु कुणाला सांगितले तर मी तुझ्या परीवाराला व तुला जीवंत सोडणार नाही.” असे म्हणत फिर्यादीचा पाठलाग करीत त्यांचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी दुपारी १२.०० वा सुमारास महेंद्र ट्रेडर्स, वीरचक्र चौक, यशवंत नगर, भगत हाईटस, तळेगांव दाभाडे येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी मोहन गंगांधर साळवे (वय २४ वर्षे, रा. फळकेवाडी, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनजवळ, तळेगांव दाभाडे ) याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















