- एचपी गॅस वितरक एजन्सीकडून तपासणी न करताच दिला सिलेंडर..
- दुर्घटनाग्रस्तांकडून गॅस एजन्सीवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- निगडी ओटास्कीम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, हनुमान बिल्डींगमध्ये मंगळवारी सकाळच्या सुमारास गॅस लिकेज होऊन सिलेंडरचा भडका उडाला. शॉर्टसर्किटमुळे चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली. घर जळून खाक झाले.
लोकप्रतनिधी, स्थानिक रहिवाशी, तसेच अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु घरातील बऱ्याच वस्तू आगीत भस्मसात झाल्या आहेत.
दुर्घटनेच्या वेळी बापू नारायण शेलार, त्यांची पत्नी आणि दोन मुले घरात उपस्थित होते. सकाळी पत्नीने स्वयंपाक करायला सुरुवात करताच सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली आणि काही वेळातच किचनमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांची मुलं दुसऱ्या खोलीत झोपली होती त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
घरातील गॅस सिलेंडर संपला म्हणून दोन दिवसांपूर्वीच एचपी कंपनीचा गॅस सिलेंडर हा अनुराग गॅस एजन्सीकडे बुक केला होता. एजन्सीने गॅस सिलेंडरची तपासणी न करताच दिला. त्यानंतर गळती होऊन दुर्घटना घडली, अशी माहिती दुर्घटनाग्रस्तांनी दिली.
सबंधित एचपी गॅस वितरक अनुराग गॅस एजन्सीच्या प्रमुखांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.















