न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- अॅटो रिक्षा (एम.एच.१४जी.सी५४४४) मध्ये बसुन फिर्यादी हे पुणे स्टेशन येथे जात होते. दरम्यान आरोपी रिक्षाचालकाने फिर्यादीस भाडयाचे पैसे देण्याच्या कारणावरुन चिडुन जावुन रस्त्यावर पडलेला दगड हातात घेतला.
फिर्यादीच्या डोक्यात व पायावर मारून त्यांना जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २४/१२/२०२२) रोजी सकाळी ९.१० वाचे सुमारास कासारवाडी गावातील आईमाता मंदीरा जवळील सोसायटी समोर घडली.
फिर्यादी मिंटु विश्वनाथ यादव (वय २३ वर्ष, धंदा मजुरी, रा. किसन लांडगे यांचे घरात भाडेकरु, लांडेवाडी, भोसरी, मुळ रा. मु.पो हडफोडा रामपुर महुवाबार, पथदेवा जि. देवरीया राज्य उत्तर प्रदेश) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















