न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- गॅस दुकानात ग्राहकांना सिलेंडर देणे, नवीन रेग्युलेटर, सुरक्षा पाईप, लायटर अशा वस्तू विक्रीसाठी फिर्यादीने आरोपी कामगाराला तोंडी सांगीतले होते. त्यामधुन मिळणारी रोख रक्कम दररोज ऑफीसमध्ये जमा करणे. गॅसच्या ऑनलाईन पेमेंट स्कॅनरवर येणारी रक्कम ऑफीसच्या अकाउंटवर जमा करण्याचे काम फिर्यादीने आरोपीला दिले होते.
परंतु, आरोपीने दररोज येणारी रोख रक्कम अकाउंटवर जमा न करता स्वतःच्या मोबाईल नंबरवर तसेच आरोपीचा भाऊ राकेश मोहनराम मांजू (मोबाईल नं. ७५७१५१५९८१), हेताराम मोनराम मांजू (मोनं ७५६८७५०३०७) व पत्नी सुमित्रा श्रावण मांजू (मो.नं. ९८७५८६०१२९) यांचा नंबर गॅसचा असल्याचे भासवून फोन पे व गुगल पेवर ऑनलाईन पध्दतीने पैसे घेतले. एकुण ३५,००,००० रूपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२०/०२/२०२१ ते दि. २९/११/२०२२) दरम्यान ओवी भारत गॅस एजन्सी, डोके बिल्डींग, शिंदेवस्ती रोड, रावेत येथे घडला. फिर्यादी निलेश चंद्रकांत डोके (वय ४५ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. शुभश्री निवास, विठ्ठल मंदिराजवळ, तानाजीनगर, लिंक रोड, चिंचवडगाव) यांनी आरोपी श्रवणकुमार मोहनराम मांजू (बिश्वोई रा. मूळगाव मंडला काला, तहसील देचू जिजोधपूर, राज्य राजस्थान, सध्या गायकवाड चाळ, जांभे, मुळशी) याच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सरू आहे.
















