- सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याकडून जीवघेणा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील शिवनेरी सोसायटी येथे अवघ्या सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. मुलाचा डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला आहे.
सुदैवाने नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने मुलाचा जीव वाचला आहे. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून १३ टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मोहम्मद शेख (वय ६ वर्षे) अस कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की कुत्र्याने हाताचे लचके तोडले आहेत.
या घटनेमुळं भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तसेच पालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर केलेला वारेमाप खर्चाचे काय झाले, असा सवाल शहरातील नागरिक प्रशासनाला विचारू पाहत आहेत.


















