न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- जागतिक महीला दिनानिमित्त शिवशाही व्यापारीसंघाच्या पिंपरी-चिंचवड शहारामधील एकुण १३ नामफलकांचे उद्दघाटन करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेच्या तसेच व्यापारीवर्गाच्या हितासाठी तसेच अन्यायाविरूध्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने ८०% समाजकारण व २०% राजकारण या विचारानुसार, अविरत संघर्षातून जनसेवा करणाऱ्या शिवशाही व्यापारीसंघाच्या नामफलकाचे उद्दघाटन शिवशाही व्यापारीसंघ महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष भाग्यश्री म्हस्के व मातंग समाजाचे जेष्ट नेते किसन लोखंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते किसन लोखंडे यांनी शिवशाही व्यापारीसंघाच्या कामाचे व धाडसाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेशदादा आहेर, गोरख पाटील, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल बाविस्कर, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे, भरत इंगळे, महीला अघाडी प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्रीताई म्हस्के, नवनाथ माऊली जाधव, रविकिरण घटकार, आशिष वाळके, गणेश पाडुळे, दत्ता गिरी, संदिप खुंटे, सागर शिंदे, रोहीत विभुत्ते, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.











