न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- ८ मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने गरजू महिला, मुलींना ड्रेस व साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमास आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून सुरवात करण्यात आली. दापोडीपर्यंत प्रत्येक चौकातील सिग्नल व रेल्वे स्टेशनवर जाऊन ड्रेस व साडी वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे चिमुकल्या मुलींसाठी फ्रॉक व कुर्ता देण्यात आला.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यास पिंपरी चिंचवड केमिस्ट असो. अध्यक्ष:संतोष खिंवसरा यांनी मोलाचे योगदान दिले. भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष: सौरभ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मदन चौधरी, प्रभाग अध्यक्ष:गणेश बच्चे, अभिजित पवार यांच्यासह अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी काही लोकांनी स्वतःहून मदत केली. गरिबांच्या गरजेचा व वेगळा महिला दिन उपक्रम म्हणून सर्वानी एकत्र येऊन हे विशेष नियोजन केले होते, असे महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी सांगितले.











