न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- रॅपिडो कंपनीविरोधात रिक्षा चालकांनी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला त्याला यश देखील मिळाले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रॅपिडो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर बाजू मांडली. यामुळेच न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे, असे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष, कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले.
दरम्यान रिक्षा चालक-मालकांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, कायदेशीर सल्लागार शारदा वाडेकर, सहायक परिवहन अधिकारी आनंद भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रमुख रिक्षाचालकांचा देखील यावेळी हार घालून सत्कार करण्यात आला. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकली ते महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांचा देखील पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.