- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- मयत फिर्यादीचे पती हे एजंट होते. ते हॉटेल व बिअर शॉपचे लायसन्स काढुन देत असत. आरोपी यांनी सी.एल. २ व सी. एल. ३ प्रकरणी एक्साईजकडुन काम करून घेण्यासाठी तसेच आरोपी इतर तिघांनी त्यांच्या बिअर शॉपीच्या लायसन्ससाठी फिर्यादीच्या मयत पतीकडे वारंवार पैश्या संदर्भात मागणी केली. त्यांना व कुंटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने चेक व नोटरी करीत त्यांच्यावर दडपण आणले. जिवन जगणे असह्य केले. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने राहत्या फ्लॅटमधील बेडरूच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहयाने गळफास घेत आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सन २०२० ते दि. ८/०१/२०२३ रोजी रात्री ९.२८ वा.च्या पुर्वी मंत्रा, २४ वेस्ट, फ्लॅट नंबर सी. १०६, गहुंजे आणि शिवरी ता. पुरंदर येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी अक्षय भुजबळ, स्वप्नील भुजबळ, आकाश नाळे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), हरिष मुसा शेख, भालचंद्र गायकवाड, किरण सोदी, तापकीरकर साहेब (रा. मुंबई, पुर्ण नाव पत्ते माहीत नाही) यांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.