न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- आकुर्डीहून चिंचवडगावाकडे पीएमपी बस जात होती. दरम्यान प्रेमलोक पार्क येथे आल्यावर चालकाचे (एमएच १४ एच यु ५५२५) बसवरील नियंत्रण सुटले. ही बस रस्त्यावरून थेट दुभाजकावर चढली.
दरम्यान घटनास्थळावरून पोलीस आयुक्तालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली. या अपघातात प्रवासी जखमी झाले नाहीत. दुपारची वेळ असल्यामुळे तसेच रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. चिंचवडकडे जात असताना हा अपघात झाला. दरम्यान घटनास्थळावरून पोलीस आयुक्तालय अगदी हाकेच्या आहे.