- उमेदवारांमध्ये संभ्रम; महापालिका निर्धास्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांनी अर्ज करून चार-साडेचार महिने उलटून गेले आहेत. अद्याप ही परीक्षा झाली नाही. महापालिकेकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. २०२३ मधील जानेवारी महिना उजाडला तरी भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही.
महापालिकेकडून कोणत्याही सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या नाहीत. उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेच्या जाहिराती बरोबरच पुणे महानगरपालिकेची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती. सध्या पुणे महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांचे जॉइनिंग देखील झाले आहे.
पालिकेने कोणत्या कंपनीमार्फत व केव्हा परीक्षा होणार आहे. त्याच्या सूचना संबंधित उमेदवारांना द्याव्यात. ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशा आशयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंचने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त १. प्रदीप जांभळे पाटील, तसेच उपायुक्त विठ्ठल जोशी यांना दिले आहे.