- अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- निगडी प्राधिकरणातील अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ज्ञानेश्वरीचे लिखाण करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. २०) रोजी निगडी प्राधिकरणातील संत तुकाराम उद्यानात आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे आणि माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, हभप चौधरी महाराज, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चांदबी सय्यद यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर आर.एस. कुमार, भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार, समीर जवळकर, कार्यकर्ते मनोज देशमुख ,अतुल इनामदार, नरेंद्र येलकर उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वरीचे लिखाण करणारे ३० मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप चौधरी गुरुजी, प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. विजय दत्त निमक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शैलजाताई मोरे यांनी केली. निवेदन सुभाष जोशी, शामसुंदर परदेशी तर आभार शर्मिला महाजन यांनी मानले.