न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- अज्ञात कारणास्तव आरोपीने तरुणाच्या डोक्यास व चेह-यावर दगडांनी जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. मारहाणीत तरुणाचा खुन केला. दिपक काशिराम राठोड (वय अंदाजे ३५ वर्ष, मुळ रा. वाशिम) असे मयताचे नाव आहे.
ही घटना (दि. १९) रोजी रात्री ११.४५ वा. चे पुर्वी मौजे महाळुंगे गावचे हद्दीत, महाळुंगे ते आंबेठाण रोडलगत, हिंगलाज स्टोअर्स दुकानासमोर, खेड, जि. पुणे) येथे घडली.
महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठठ्ल मंगेश चव्हाण (वय २२ वर्षे, रा. वसंत महाळुंगकर यांची रूम, महाळुंगे, मुळ रा. अंधबोरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.