न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे चिंचवड निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासनात बदल केले आहेत. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे करसंकलन आणि चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जबाबदारी होती.
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी करसंकलन किंवा एलबीटी प्रमुखाकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली जाते. त्यामुळे करसंकलनची जबाबदारी उपायुक्त ढोले यांच्याकडे सोपविली आहे. त्यासोबतच करवसुलीची जबाबदारी देशमुख यांच्याकडे सोपविली आहे. प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी फेरबदलाचे आदेश काढले आहेत.