न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- कॉलेज संपल्यानंतर फिर्यादी या रस्त्याने जाताना आरोपी हा त्याच्या रिक्षातुन आला. फिर्यादीला कट मारुन पुढे गेला. फिर्यादी घटनेचा व्हीडीओ बनवत असताना आरोपीने पाहिले. काही वेळाने आरोपी रिक्षा घेवुन माघारी आला.
फिर्यादीचा हात पकडुन त्यांना जवळ ओढले. त्यावेळी त्यांच्या मनास लज्जा निर्माण झाली. तसेच आरोपीने फिर्यादीला “ माझी रिक्षा जर उचलली तर तुम्हाला बघुन घेईन ” अशी धमकी दिली. वाईट शिवीगाळ करुन आरोपी रिक्षातुन निघुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वा. च्या सुमारास नव महाराष्ट्र कॉलेजसमोरील रस्त्यावर, पिंपरी येथे घडला. १७ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी स्वप्नील भालगिरे (रा. भाटनगर, पिंपरी, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.