न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- झेरॉक्सच्या एका बाजुला झेरॉक्स व्यवस्थिती न आल्याचा राग आरोपीने मनात धरला. झेरॉक्सचे पैसे न देता फिर्यादीशी हुज्जत घातली. टेबलावर ठेवलेले प्रिंटर व झेरॉक्स छोटा मशीन उचलुन टेबलावर आपटले. फिर्यादीच्या गळयात घातलेली ओढणी व हात धरून फिर्यादीस वाईट वाईट शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करुन फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी १२.०० ते १२.१५ वा.चे दरम्यान काळेवाडी फाटा येथील सुझकी शोरुमच्या शेजारी, ग्राहक सुविधा केंद्राच्या दुकानात, काळेवाडी फाटा येथे घडला.
३४ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी सहदेव मंगलराव टाक (वय ४५ वर्षे, रा. गणेश मेडीकल शेजारी, काळेवाडी फाटा, थेरगांव) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.