न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- पिंपरीतील अमर शहीद हेमू कलानी यांच्या स्मारकाला भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी भेट देऊन श्रद्धांजली अर्पित केली.
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, जयेश चौधरी, श्री व सौ गणेश वाळुंजकर, गणेश ढाकणे आदी उपस्थित होते.
२१ जानेवारी १९४३ रोजी शहीद हेमु यांना इंग्रजांनी फाशी दिली होती. इंग्रजांची रेल्वे पूर्ण नेस्तानुभुत केली व ट्रॅक खोलला म्हणून त्यांना इंग्रजांनी फाशी सुनावली होती. फाशीच्या क्षणीही त्यांनी भारत मातेच्या रक्षेसाठी मी हे कृत्य केले आहे, असे ठामपणे सांगितले होते. १९८३ मध्ये वर्ल्ड सिंधी संमेलनामध्ये भारत सरकारने हेमू यांचे स्मृतीनिमित डाक तिकीट जारी केले होते, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.