न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२३) :- दरवर्षीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी चाकण – भोसरी MIDC उद्योजक संघटना यांनी MIDC प्रीमियर लीग क्रिकेट जियाताई कप स्पर्धेचे आयोजन अतिशय दिमाखात केलेले आहे. या स्पर्धेसाठी मुख्य आयोजक म्हणून जियाताई लेझर कंपनी, सहप्रायोजक म्हणून अल्ट्रा कॉर्पोटेक कंपनी, तसेच बोडोर लेझर, नेत्रा सेल्स व किंजल प्रिस्टीन यांनी देखील सहप्रायोजकत्व देऊ केलेले आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी उद्योजक जगतातील दिग्गज उद्योगपती, उद्योजक व हजारो कर्मचारी वर्ग हा उपस्थित राहणार आहेत.
या MIDC प्रीमियर क्रिकेट लीग जियाताई कप स्पर्धेची माहिती चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे यांनी देताना सांगितले की सदर स्पर्धा ही कंपनीचे मालक व कंपनीचे कामगार यांच्यामध्ये सौह्दार्याचे वातावरण तयार करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते. पहिल्या वर्षी 4 कंपन्याच्या टीम्स खेळल्या, दुसऱ्या वर्षी 8 कंपन्याच्या टीम्स व यावर्षी 12 कंपन्याच्या टीम्स खेळणार आहेत. प्रत्येक कंपनीच्या टीम मध्ये स्वतः कंपनीचे मालक व कर्मचारी हे टीम तयार करून खेळत असतात. सदर स्पर्धा ही युट्युब लाईव्ह वरून देखील दिसणार आहे. तसेच या स्पर्धेकरिता कंपनीच्या टीम्सना सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहे जसे की डग आऊट, पॅव्हिलियन, VIP लाऊंज, भोजन व्यवस्था, DJ सिस्टीम, MCA अंपायर, DRS, सर्व टीम प्लेयर्सना जर्सी, ट्रॅक पॅन्ट, कॅप्स आदी. वर दिलेल्या बॅनरवर स्पर्धेची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
ही स्पर्धा सिल्वर क्रिकेट ॲकॅडमी पाटील नगर, चिखली येथील स्टेडियमवर आयोजित केली असून 23,24 व 25 जानेवारी 2023 रोजी ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फक्त चाकण – भोसरी MIDC उद्योजक संघटनेशी संलग्न असलेल्या कंपन्यांच्या टीमलाच खेळता येणार असून संघटनेबद्दल अधिक माहितीसाठी संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे व संघटनेचे संचालक श्री प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधावा लागेल. ( मोबाईल नंबर 9850626307, 9822069630 )
सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी MIDC प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे मुख्य समन्वयक श्री निखिल देशमुख, CA ऋषी खळदकर, प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे यांनी केलेले आहे.















