न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- अग्रवाल समाज फेडरेशन पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना माता माधवी आग्रगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी अगरवाल फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजबाला गोयल, उपाध्यक्ष विनोद बंसल, सचिव के एल बंसल, खजिनदार श्याम गोयल, कार्यकारिणी सचिव राजेश आगरवाल, भाजपचे प्रवक्ता श्वेता शालिनी, महाराष्ट्र राज्य आगरवाल संमेलनाच्या अध्यक्षा मालती गुप्ता आगरवाल, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
श्वेता शालिनी म्हणाल्या की, महिला सबलीकरणासाठी सर्वांनी एकत्र येवून तन मन धनाने प्रयत्न केले पाहिजे. स्वतंत्र्याचा गैरवापर टाळावा. आगरवाल समाज हा निरंतर प्रगती करताना दिसत आहे.
गोयल म्हणाले की, पुरस्कारा सारख्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळेल. सामाजिक कार्यात महिलांचे स्थान वाढले पाहिजे.
महिला समितीच्या वतीने रंगारंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या भक्तांचा विशेष सत्कार केला.
जीवनगौरव – अमीता राजकुमार आगरवाल, आदर्शग्रहिणी उर्मिला सज्जन कुमार तुलश्यान, कांता आगरवाल, आदर्श माता सावित्री सुरेंद्र कुमार अग्रवाल, विद्यादेवी दयानंद अग्रवाल, सत्यवती राधेश्याम गोयल, सामाजिक कार्य निकीता भारत गुप्ता, सांस्कृतिक क्षेत्र मीनु सुनिल पोद्दार, आरोग्य सेवा शीतल निलेश आगरवाल, समाज अध्यक्ष निना नितीन गुप्ता, व्यापार क्षेत्र खुशबू विशाल आगरवाल, शैक्षणिक क्षेत्र शकुंतला विनोद बंसल, खेल क्रिडा त्रुप्ती विपीन गुप्ता, युवारत्न रेशमा राजेंद्र आगरवाल, राजकीय दिपीका राजीव आगरवाल आदींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता आगरवाल व सुधीर आगरवाल यांनी केले, तर पुरस्कार प्राप्ती महिलांचा परिचय संजीव आगरवाल यांनी करून दिला. आभार विनोद बंसल यांनी आभार मानले.











