न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,सामाजिक कार्यकर्ते विश्वजित इंदलकर सर,फहाद खान,सुमन विश्वकर्मा,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भक्ती पठाडे इयत्ता तिसरी, मोहित, लावण्या प्रधान इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दोन मिनिट मौन पाळण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय इंगळे या विद्यार्थ्याने केले व रहीम शेख यांनी आभार मानले.