न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते आज पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ, बालाजी अय्यंगार, वाहन चालक संघटनेचे राजेश जाधव आदी उपस्थित होते.