न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रम आज मंगळवारी (दि. ३१) रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी संजय शकंर सरकाळे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक, नेम. वाकड पोलीस स्टेशन, राजेंद्र हरिदास चौधरी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक नेम, नियत्रंण कक्ष, पिंपरी चिंचवड, राजेंद्र केशव भोसले, सहायक पोलीस उप निरीक्षक नेम, पिंपरी वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड, शिरीष कोंडाजी रसाळ, श्रेणी पोलीस उप निरीक्षक नेम, पिंपरी पोलीस स्टेशन, संजय लिलाधर कुलकर्णी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक नेम, वाकड पोलीस स्टेशन, ६. बबन सटबाजी डोईफोडे, सहायक पोलीस उप निरीक्षक नेम, आळंदी पोलीस स्टेशन, देवदत्त माधवराव पवार, कार्यालय अधीक्षक पिंपरी चिंचवड हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातुन सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी /अंमलदार यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आपण जरी सेवानिवृत्त झालेला असाल तरीसुध्दा पोलीस विभागासाठी आणि समाजासाठी कार्य करावे व आपल्या अनुभवाचे योगदान द्यावे.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, रावसाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी/अंमलदार यांनी देखील सत्कारमुर्ती यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.












