न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- बारामती येथील टेक्सटाइल पार्क, काटेवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजित सुनेत्रा उद्यान, विद्या प्रतिष्ठान आदी ठिकाणी भेट देऊन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील महिलांनी माहिती घेतली. असे प्रकल्प राज्यात विविध ठिकाणी उभारल्यास शहरे स्वयंपूर्ण होतील असा आशावाद राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील महिलांनी बारामती येथील विविध प्रकल्पना भेट दिली. यावेळी महिलांनी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्क, काटेवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजित सुनेत्रा उद्यान, विद्या प्रतिष्ठान आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्क व एन्व्हारमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांची देखील भेट घेण्यात आली.












