न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये दि. ३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
आज (दि. १) रोजी विहित वेळेत २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यात अॅड. अनिल बाबू सोनावणे यांनी २ तर मिलिंद कांबळे यांच्या नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे.












