न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढणार नाहीत. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र दगाफटक्याच्या भीतीने पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
त्याचवेळी शरद पवारांनी नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी याबाबतची माहिती दिली.
“पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. शेतकरी कामगार पक्षानेही पार्थ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात किती उमेदवार म्हणून आम्ही कुटुंबाने आणि पक्षाने चर्चा केली. शिवाय माझी राज्यसभा टर्म अजून शिल्लक आहे, कौटुंबीक चर्चेनंतर मी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. तसेच सुप्रिया सुळे बारामतीतून आणि पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवतील असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.











