न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवार (दि. ११) रोजी वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत निर्देश दिले. तसेच आयुक्त कार्यालयात फ्लेक्स व जाहिरातदारांची बैठक देखील घेण्यात आली.
महापालिका हद्दीतील खासगी जागेतील फ्लेक्स हटविण्यात यावेत. राजकीय नेत्यांची छबी असलेल्या जाहिरातीचे फलक काढून टाकावेत. कोणत्याही राजकीय पक्षाची जाहिरात होऊ शकेल, असे फ्लेक्स तातडीने हटविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे, जाहिरातदार बैठकीला उपस्थित होते.
पत्रकारांना माहिती देताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, महापालिकेने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिका मालमत्ता तसेच आवारातील राजकीय नेत्यांचे फोटो, बॅनर्स आणि मतदारावर प्रभाव पाडू शकणार लिखाण झाकण्यात आले आहे. पदाधिका-यांच्या दालनातील नेत्यांची छबी देखील झाकण्यात आली आहे. ही कार्यवाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासांत करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
याशिवाय शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्स हटविण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे. तर, खासगी जागेत लावलेले पलेक्स २९, हटविण्यासाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात याही कामाची जाहिरात, निविदा प्रसिद्ध केली जाणार नाही. कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येणार नाहीत, असेही पाटील यांनी सागितले .















