न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील चूक किंवा त्यातील त्रुटी शोधणे. याला म्हणतात फेसबूकवरील बग. सांगवीत राहणाऱ्या विजेता पिल्ले यांनी हे काम यांनी केले आहे.
फेसबूकने नुकतेच आपले ”बिझनेस चॅटिंग ॲप वर्कप्लेस” हे ॲप लॉन्च केले होते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे ॲप सर्वाधिक वापरले जाते. वर्क प्लेसमध्ये बग आढळल्याने हे ॲप वापरणाऱ्या कंपनीच्या सुरक्षिततेलाही धोका पोहोचू शकतो. विजेता यांनी ही चूक फेसबूकच्या निदर्शनास आणून दिली.
त्याबदल्यात विजेता यांना एक हजार डॉलर म्हणजेच आपल्याकडील ६४ हजार रुपयांचे बक्षीस फेसबूकने दिले आहे. विजेता या एका बांधकाम कंपनीत सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पदावर कार्यरत आहेत. त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर नाहीत. अथवा त्यांना तंत्रज्ञानाचे फारसे ज्ञान नसताना, त्यांना वर्कप्लेसमधील चूक लक्षात आली आहे.















