- राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी ट्वीट करत याबाबत दिली माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. दरम्यान ते आज दुपारी अजितदादा पवार यांच्यासह आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ हा आम्हाला विश्वास आहे, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.


















