- अजितदादांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक विभागास सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि ७) रोजी आपला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज थेरगाव निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आरपीआय खरात गट, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २६ फेब्रुवारीला पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. सोमवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी देखील डमी अर्ज सादर केला आहे. तर सोमवारपर्यंत १४ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) राहुल कलाटे हे देखील आज अपक्ष अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.


















