- जांबे गावातील अनधिकृत आरसीसी बांधकामांवर पीएमआरडीएचा जेसीबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- मुळशी तालुक्यातील जांबे गावातील दोन ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने मंगळवारी कारवाई केली.
गट नंबर ८९ व ८४ याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएच्या सर्वेक्षणात आढळून आली होती. त्याची दखल घेऊन पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने जी+ १ स्वरूपाच्या ५७०० चौरस फूट व वाणिज्य स्वरूपाच्या सुमारे ४०५० चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
तीन पोकलेनच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. कारवाई करताना पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले. अनधिकृत बांधकाम करणा-या व्यक्तींकडून कारवाईचा सर्व खर्च वसूल केला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


















