न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोघांनी फिर्यादीला लिफ्ट दिली. महावीर चौकातील ब्रीजवर गाडी थांबवून आरोपींनी फिर्यादीशी झटापट केली. फिर्यादीकडून चार हजार रुपये किंमतीचा आयफोन ७ व १०,००० रुपये रोख रक्कम काढुन त्यांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ७) रोजी पहाटे २.०० ते ३.०० वाजेच्या दरम्यान महावीर चौकाकडुन कामीनी हॉटेलकडे जातांना चिंचवड ब्रीजवर घडली.
फिर्यादी प्रथमेश मनोरंजन जोशी (वय ३२ वर्षे, कायम पत्ता – ६२ बी/एम स्कीम नं. ७८, विजयनगर, इंदौर, सध्या – कामीनी हॉटेल, रुम नं. १०३, अहिंसा चौक, चिंचवड) यांनी अनोळखी दोघांच्या (वय अंदाजे १८ वर्ष, रंगाने सावळे, दोघांपैकी एकाने लाल रंगाचा आणी पिवळया रंगाचा जॅकेट घातेलला, दोघांपैकी ऐकाने तोंडावर लाल रंगाचा मास्क घातलेला अश्या वर्णनाचे) विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ६६/२०२३. भा.द.वि कलम ३९२,३४ अन्वये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















